| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुका पोलीस ठाणे तर्फे येथे आगामी दहीहंडी व गणेश उत्सवनिमित्ताने पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक सहा. पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी विविध सूचना देण्यात आल्या.
या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी विविध सूचना केल्या. त्यामध्ये कार्यक्रम ठिकाणी सीसीटीव्ही लावणे व स्वयंसेवक यांची नेमणूक करावी. संबंधीत सर्व आस्थापनाची परवानगी विहीत वेळेत प्राप्त करणे, उत्सवा दरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, तसेच इतर नागरीकांना त्रास होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घेणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना प्रथमोउपचार पेटी, डॉक्टरांची टीम, ॲम्बुलन्स इत्यादी सोय करणे, कार्यक्रमावेळी कोणत्याही जाती-धर्माच्या धार्मीक भावना दुखावल्या जातील असे बॅनर/पोस्टर, आक्षेपार्ह गाणे, पेोवडा, वाद्य, संगीत लावू नये, तसेच आक्षेपार्ह भाष्य करू नये, आदींबाबत मार्गदर्शन केले. दहीहंडी उत्सवानिमित्त भेट देणाऱ्या सलामी पथकाची नोंद रजिस्ट्री ठेवावे. तसेच 14 वर्षांखालील मुले/मुली हे दहीहंडी फोडणार नाही, यांची खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.







