| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयातील किशोरवयीन मुलींना मासिक पाळी तसेच विविध प्रकारच्या आजारासंदर्भात मार्गदर्शन पंचक्रोशी आगरी समाजाच्या सभागृहात करण्यात आला. या विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी लता शिरसाठ यांनी मासिक पाळी विषयावर मार्गदर्शन करताना शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे होणारे परिणाम स्पष्ट केले. नेहा कानवेकर यांनी मासिक पाळीच्या काळात कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. अर्चना खोत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर मुख्याध्यापक श्रीधर ओव्हाळ यांनी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या प्रसंगी पर्यावरणपूरक जो मातीत सहज विरघळतो अशा सुती सॅनिटरी पॅडची विक्री करून स्वयंरोजगार कसा मिळविता येईल याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास नांदगावच्या सरपंच सेजल घुमकर, मेघा मापगावकर, रिद्धी सुर्वे, निशा शिरवाडकर, भारती बांद्रे , शिल्पा कळके, नियती ठमके, राजश्री घाडगे, प्रितम शेडगे आदींसह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.