| सुधागड | प्रतिनिधी |
तालुका कृषी अधिकारी कार्यालय सुधागड-पाली आणि श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत संस्था पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि.5) पाली फूड फॉरेस्ट येथे करण्यात आले होते. यावेळी पाली फूड फॉरेस्टचे संस्थापक डी.बी. राय यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले. प्रसाद दगडे यांनी गांडुळ खत, जीवामृत द्रावण, ह्युमिक ऍसिड, पोल्ट्री स्लरी, सप्त धान्य स्लरी यांचे प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमात शेतकरी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता. या प्रशिक्षणाला पालीचे मंडळ कृषी अधिकारी भोसले, परळीचे कोळपे, उप कृषी अधिकारी आढाव व पांढरे, तसेच सर्व सहाय्यक कृषी अधिकारी व कृषी सेवक उपस्थित होते.







