| उरण | प्रतिनिधी |
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उरण पोलीस विभागाच्या सहकार्याने उरण पोलीस स्टेशन येथे जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दारू व अंमली पदार्थांच्या व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत असलेले दर्शन नाईक व त्यांच्या व्यसनमुक्ती समुदायातील काही सहकारी सहभागी झाले होते. या प्रसंगी दर्शन नाईक यांनी उरण परिसरात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांचे सेवन, मद्यपानाचे व्यसन तसेच स्क्रीन (मोबाईल/डिजिटल) व्यसन याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. या व्यसनांचा युवकांवर, कुटुंबव्यवस्थेवर आणि सामाजिक सुरक्षिततेवर होणारा परिणाम त्यांनी सविस्तरपणे मांडला. कार्यक्रमादरम्यान व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध असलेली मदत, बैठकींची रचना, गोपनीयता, तसेच गरजूंना योग्य दिशेने मार्गदर्शन कसे करता येईल, याबाबत उपयुक्त माहिती व दृष्टिकोन देण्यात आला.
उरणमध्ये व्यसनमुक्तीविषयी मार्गदर्शन
