। अलिबाग । वार्ताहर ।
शहाबाज पंचक्रोशीतील इयत्ता आठवीपासून पदवीधर विद्यार्थ्यांसाठी दि.28 जून रोजी शहाबाज येथे सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय यांच्यामार्फत गणपती मंदिरात व्यवसाय व शिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सुहास पाटील, आल्हाद पाटील, अविनाश पाटील, यशवंत पाटील, विवेक पाटील, नितीन पाटील, मंगेश भगत, डॉ. प्रगती पाटील, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपल्या व्याख्यानात सुहास पाटील यांनी माझगाव डॉक (भारत सरकार) लिमिटेड कंपनीतील आय.टी.आय., डप्लोमा कोर्सेस, इतर सरकारी नोकरीच्या संधीबाबत आणि करियर विषयी विस्तृत माहिती दिली. स्पर्धा परीक्षांकडे आजचा विद्यार्थी वळत नाही त्याकरिता पालकांबरोबर विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना पाटील यांनी तर आभार प्रदर्शन वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी केले.