लोहप आरोग्य केंद्रात आहारविषयी रेसिपी प्रदर्शन
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
लोहप प्राथमिक आरोग्य केंद्रात आहारविषयी रेसिपी प्रदर्शन ठेवण्यात आले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलींनी तेवीस प्रकाराच्या रेसिपी या ठिकाणी बनविल्या होत्या. घरच्या घरी आणि जलद गतीने होत असलेल्या ह्या रेसिपी आरोग्य उत्तम राखण्यास मदत होत असते, असे यावेळी सांगण्यात आले.
आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकजण बाहेरील पदार्थ यांची मागणी करीत असतो. मात्र, बाहेरील अन्न सातत्याने आपल्या शरीरासाठी योग्य नसते. तसेच डॉक्टरसुद्धा घरचे ताजे अन्न खाण्याचा सल्ला देत असतात. परिणामी, बाहेरील अन्न आपल्यासाठी हानिकारक असते. यामुळे घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण उत्तम काही बनवू शकतो. यासाठी हे प्रदर्शन आयोजन करण्यात आले. यावेळी गरदोरपणाचा आहार, वयोवृद्ध, तसेच लहान मुलांचे आहार, तसेच आजारी व्यक्तीविषयी सख्योल मार्गदर्शन प्रत्येकांना देण्यास येत होते.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी, डॉ. मंगेश देशमुख, जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग सेविका गायत्री म्हात्रे, परिचर्या अधिकारी प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय अलिबाग सारिका पाटील, परिचर्या पाठ्यनिर्देशिका प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय अलिबाग स्वाती मोरे, नोजेमोद्दीनं काझी, आरोग्य सहायिका मीना खरात, फार्मसी ऑफिसर सोनाली गाढे, लॅब ऑफिसर समीक्षक पाखरे आदींच्या उपस्थिती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या परिसरातील ग्रामस्थ तथा रुग्णांनी सहभाग घेऊन आरोग्यवर्धक आहाराविषयी माहिती समजून घेतली.






