विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जाणीव जागृती अभियान

। कर्जत । वार्ताहर ।

कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस आणि एम्पॉहर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर येथे सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाविषयी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

मुलांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श कसे ओळखायचे, असुरक्षित स्पर्श जाणवल्यास काय करायचे तसेच कुठल्याही स्पर्शाने तुम्हाला त्रास होत असेल, अस्वस्थ किंवा बेचैन वाटत असेल तर अशा प्रसंगात नो, गो, टेल हि त्रिसूत्री वापरायची म्हणजेच असुरक्षित स्पर्श जाणवल्यास तुम्हाला तो स्पर्श आवडला नसल्याचे त्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगा, तिथून निघून जा आणि विश्‍वासातील व्यक्तीला त्याबद्दल सांगा. पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक सोनाली घोलप आणि एम्पॉहर फाउंडेशनचे अर्जुन माळगे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महिला मंडळ शाळा येथील शिक्षिका व इतर कर्मचारी तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version