सावळे येथे विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन

| रसायनी | वार्ताहर |

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालय सावळे रसायनी या विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, माता मालक, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, ग्रामपंचायत सावळे, देवलोली, नारपोली, जाताडे सदस्य, रा.जि.प. सावळे, बचत गट महिला, शालेय पोषण आहार बचत गट महिला, आशा वर्कर, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच रसायनी पोलीस ठाण्याचे एपीआय प्रमोद जाधव, जाधव मॅडम, पोलीस मंगेश लांगी, पोलीस महिला कर्मचारी चोबळे मॅडम, माजी सभापती गजानन माळी, सरपंच सुनिल माळी, काशिनाथ कांबळे आदी उपस्थित होते.

शाळा, शाळेतील विद्यार्थी सुरक्षिततेबाबतची माहिती एपीआय प्रमोद जाधव यांनी दिली. तर महिला पोलीस जाधव मॅडम, कांबळे मॅडम यांनी पालकांना मार्गदर्शन करत कुठे सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रार पेटी, बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच स्थानिक स्कूल समितीच्या सदस्यांनीदेखील याबाबत पालकांना सांगितले. तसेच महिला रेखा पवार यांनी महिला प्रतिनिधित्व म्हणून उपस्थितांना सुरक्षेबाबत माहिती दिली.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजपूत यांनी विद्यार्थी सुरक्षिततेबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ सर्वांनी सजगता बाळगणे गरजेचे आहे. त्यावर आपणच आपल्या मुलांची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version