वाहतुकीच्या नियमांचे मार्गदर्शन

। शिहू । वार्ताहर ।
नागोठणे महिला दक्षता समितीच्या माध्यमातून को. ए. सो माध्यमिक शाळा शिहू येथे विद्यार्थ्यांना महिला विषयक कायदे, सायबर फसवणूकी बाबत बचाव, अल्पवयीन मुलांना वाहतुकीच्या नियमांविषयी मार्गदर्शन नागोठणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कदम यांनी केले. वाहतुकीच्या नियमांविषयी बोलताना त्यांनी सोळा वर्षाखालील मुलांना वाहतूक नियमांनुसार कोणत्याही प्रकारचे वाहन चालवणे कायद्याने गुन्हा आहे, नियमांचे उल्लंघन केल्यास पालकांना दोषी धरले जाईल. रस्ते अपघात कमी करण्यासाठी सर्वांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे असे सांगितले. यावेळी दामिनी पथक अधिकारी नम्रता अय्यर, नागोठणे दक्षता समिती अधिकारी प्रतीक्षा गायकवाड, रामनाथ ठाकूर, मंजुळा म्हात्रे, डॉ. कांचन शेळके, श्रीधर गदमले, उषा म्हात्रे, राजेंद्र जाधव, जनार्दन शेळके, प्रदीप दळवी, कमला ठाकूर, व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version