विविध शैक्षणिक उपक्रमांवर मार्गदर्शन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

पंचायत समिती मुरुडच्या शिक्षण विभागांतर्गत बोर्ली केंद्राची शिक्षण परिषद कोर्लईच्या जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आली. मुरुडचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सभेत विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी सुरक्षा, विनोबा ॲप, मुख्यमंत्री माझी शाळा, व्हीएसके आणि एमडीएम उपस्थिती, परसबाग, संचमान्यता, आधार अपडेशन या आणि अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, अलीकडेच शिक्षकांसाठी सक्तीची केलेल्या टीईटी परीक्षेतील पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या शरद पाटील, महेंद्र सातामकर या शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मानसी कवळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परिषदेस मुरुडचे शिक्षण विस्तार अधिकारी महेश कवळे, बोर्ली बीटाचे विस्तार अधिकारी सुनील पाटील, बोर्लीचे केंद्रप्रमुख निलेश वारगे तसेच देवेंद्र पाटील, हेमंत भोईर, राजेंद्र पाटील, सुनील वेगस, मंजिरी गायधनी, सीमा पाटील, वैशाली पनासे आणि केंद्रातील इतर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version