जलजन्य आजारा बाबत मार्गदर्शन

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र पाली व नांदगाव उपकेंद्र यांच्यावतीने राष्ट्रीय किटकजन्य आजार व जलजन्य आजार यांची लक्षणे व उपाययोजना याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होताना दिसते. त्यामुळे साथीचे आजार देखील बलावताना दिसतात. यामध्ये हिवताप ,डेंग्यू, मलेरिया ,चिकुन गुनिया, हत्तीरोग ,मेंदुज्वर यासारख्या आजारांचे प्रमाण वाढते.या आजारापासून आपले संरक्षण करावयाचे असल्यास आपण आपल्या परिसरात खड्ड्यांमध्ये पाणी साठवून ठेवू नये ही खबरदारी घेणे गरजेचे आहे तसेच आपल्या परिसरात नारळाच्या करवंट्या, बूट प्लास्टिक कप ,फुटकी भांडी, फुलदाणी अशा पाण्याची साठवणूक होणार्‍या वस्तूंची योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे आहे त्यामुळे डासांची पैदास होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन करताना आरोग्य सहाय्यक वारगुडे यांनी सांगितले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पाली तर्फे वाय के वारगुडे,एल जे कापसे, के बी मोकल, एस डी जाधव, एच एस तेलंगे,बी टी मारकड, आर पी तांबडे ,एल के करे, यु के तांबडे, एम आर पाटील ,एन आर ठाकूर, एस एस भगत तसेच सहा शिक्षक ए पी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version