अलिबाग नपा उर्दु शाळेत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
इकरा एज्युकेशन सोसायटी अलिबाग या शैक्षणिक क्षेत्रा मध्ये सामाजिक कार्य करणार्‍या संस्थे मार्फत अलिबाग नगर परिषद उर्दु माध्यमिक शाळेत दहावी च्या विद्ध्यार्थ्यांसाठी एक दिवसीय मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जमालुद्दीन युसूफ सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहरातील विविध नामवंत उर्दु शाळांचे अनुभवी मोडरेटर व शिक्षकांनी सर्व विषयांवर विद्ध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्याच बरोबर अभ्यास कसा करावा व दहावी बोर्ड परीक्षेत ठरावीक वेळेत उत्तर पत्रीका कशी लिहावी जेणेकरून जास्तीत जास्त गुण मिळतील याचं प्रशिक्षण दिले.तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रशनांचे समाधानकारक उत्तर दिले.

संस्थेच्या वतीने अध्यक्ष जमाल सय्यद, सचिव रमजान सय्यद,ड जुनैद घट्टे,सज्जाद पल्लवकर व शाळेच्या मुख्याध्यापिका रफिका हलडे यांनी नगराध्यक्ष मा.प्रशांत नाईक,मा.चित्रलेखा पाटील, मा.वृषाली ठोसर मेडम,कैसर दनदने व आमंत्रीत शिक्षक जव्वाद हसन धनसे सर,नफीस शेख सर,मुनव्वर मलिक सर,मो. रऊफ सर,वसीम खान सर आणि आबीद सर मान्यवरांचे आभार मानले.

Exit mobile version