याकुब बेगमध्ये विद्यार्थ्थांना मार्गदर्शन

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित,याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज पनवेल व पी.ई.एस.इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज पनवेल येथे प्रसिद्ध शिक्षण तज्ञ मुबारक कापडी यांचे व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कापडी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्व, वेळेचे नियोजन,भविष्यातील संधी,कोण कोणत्या क्षेत्रात करिअर केले जाऊ शकते याबाबत मार्गदर्शन केले.यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतीसाद दिला.सदर कार्यक्रमासाठी इक्बाल काझी, असिफ शकूर,अलीम पटेल, खजिनदार माझ मुल्ला, संस्थेचे सदस्य मोहम्मद हनीफ मास्तर,उसामा गुलाम हुसैन पटेल,अब्दुल कुद्दूस डोलारे,पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभारप्रदर्शन माझ मुल्ला यांनी केले तर सूत्रसंचालन अख्तरी दळवी यांनी केले.

Exit mobile version