। नागपूर । प्रतिनिधी ।
गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत 10 हजार मीटर शर्यतीत सेनादलाच्या गुलवीर सिंगने कांस्यपदक जिंकले हाते. त्याने शुक्रवारपासून बंगळूर येथे सुरू झालेल्या 63 व्या खुल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत 30 वर्षे जुना स्पर्धा विक्रम मोडीत काढला आहे. पुणे येथे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये युनूस खान यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार्या गुलवीरने 5 हजार मीटर शर्यतीत 13 मिनिटे 54.70 सेकंद अशी वेळ दिली आणि केवळ दोन शतांश सेकंदाने स्पर्धा विक्रम मोडीत काढला आहे. 1994 मध्ये चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत रेल्वेच्या बहादूरसिंगने नोंदविलेला 13 मिनिटे 54.72 सेकंदाचा स्पर्धा विक्रम आता इतिहासजमा झाला आहे.