गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

। मुंबई । वृत्तसंस्था ।
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंना सात दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती. सदावर्तेंचा वकिल आज तिसऱ्यांदा बदलण्यात आला आहे. आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशीला 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंचा जामीनासाठी अर्ज करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता सदावर्तेंन न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी त्यांना 13 एप्रिलपर्यंत दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सदावर्ते यांची पोलिस कोठडी संपली. त्यानंतर आज सदावर्तेंना न्यायालयात हजर करण्यात आले होते. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version