| अलिबाग | प्रतिनिधी |
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वी संकुलातील ‘प्रभाविष्कार’ प्राथमिक-माध्यमिक मराठी माध्यम व बी. एड महाविद्यालयाचे विविध गुणदर्शन सोहळ्याचे उद्घाटन लेखक, दिग्दर्शक, गीतकार, कलाकार नरेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी वेश्वी ग्रामपंचायत उपसरपंच आरती प्रफुल्ल पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनंत मुळुस्कर, रविंद्र पाटील, राजेंद्र राऊळ, रुपाली गुरव, मृदुला मगर, जुईली शेळके तसेच संकुलातील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य नितीश मोरे, कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, ॲकॅडमिक डायरेक्टर श्रुती सुतार, राजश्री पाटील व मुख्यकार्यालयाच्या मनिषा रेलकर, प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्राचार्य रवींद्र पाटील, प्राचार्या श्रद्धा सरदेसाई, मुख्य कार्यालयाचे हिरेन राठोड, अंकित भानुशाली, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, पीएनपी सीबीएसई स्कुलच्या मुख्याध्यापिका वेणी वेल्लईम्मल्ल, उपमुख्याध्यापिका सदाफ शाहबाजकर, शर्मिला शेट्ये, इतर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्काराचे सादरीकरण केले.