। रेनोसा । वृत्तसंस्था ।
अमेरिका-मेक्सिको सीमेजवळील मेक्सिकन सिटीमधील रेनोसामध्ये अंदाधुंद गोळीबार आला. अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात किमान 18 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. हल्लेखोर एका वाहनात होते आणि त्यांनी सामान्य नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.
गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला. सुरक्षा दलाच्या जवानांनी चार संशयितांना ठार केले आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली. सोशल मीडियावर घटनास्थळावरील फोटो व्हायरल होत असून यामध्ये मृतदेह दिसत आहेत.
रेनेसोच्या महापौर माकी एस्तेर ऑर्टिज डोमिंगुएज यांनी ट्विट करून नागरिकांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. तामाउलिपासचे राज्यपाल फ्रान्सिस्को ग्रेसिया काबेजा डे वाका यांनी रविवारी या घटनेचा निषेध करत हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांबाबत संवेदना व्यक्त केली. गोळीबाराच्या घटनेनंतर मेक्सिन लष्कर. नॅशनल गार्ड, राज्य पोलीस आणि अन्य यंत्रणा घटना स्थळी दाखल झाल्या. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. रेनेसा हा अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी मेक्सिकोतील मुख्य क्रॉसिंग पॉईंट आहे.