चिरनेरच्या इंग्रजी माध्यम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

| चिरनेर | वार्ताहर |

चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम स्कूलमध्ये शनिवारी (दि. 20) गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी वक्तृत्व आणि नृत्याचे प्रकार सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धाही यावेळी घेण्यात आल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचे चरण स्पर्श करीत आशीर्वाद घेतले.

दरम्यान, मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे यांनी पूर्वीच्या काळी शिष्य हे ज्ञान घेण्यासाठी गुरूंकडे आश्रमात राहात असत. ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे. आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र, गुरूंकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. आणि म्हणून आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सांगितले.

यावेळी पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या सुनिता खारपाटील, प्रशासकीय अधिकारी व्ही.ए. पाटील, मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे, मुख्याध्यापिका मंदा घरत, मुख्याध्यापिका स्मिता मसुरकर तसेच शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version