पोयनाड विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

| पेझारी | वार्ताहर |
को.ए.सो. ना.ना. पाटील हायस्कूल पोयनाड येथील सुलभाकाकू सभागृहामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मुख्याध्यापक के.के. फडतरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि राजेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कलापथकाने सादर केलेल्या ईशस्तवनाने झाली. याप्रसंगी गुरूगौरवगीतही सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायली पाटील यांनी सादर केले. यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधीने सर्व गुरुजनांना गुलाबपुष्प व भेटवस्तू प्रदान करून आदर व्यक्त केला. त्यानंतर विद्यार्थी काव्य पाटील, पायल नाईक, चैताली शिंदे, सेजल भगत, प्रार्थना मांडवकर यांनी गुरुपौर्णिमेविषयी माहिती आपल्या भाषणातून सांगितली. तसेच शिक्षक उदय पाटील, राजेश स्वामी, अविनाश पाटील यांनीही मानवी जीवनामध्ये गुरूंचे महत्त्व आणि शाळेमध्ये शिक्षकांचे महत्त्व त्याच अभ्यासाबरोबर शिस्त ही किती महत्त्वाची आहे याविषयी माहिती आपल्या मनोगतपर भाषणातून विशद केली. याप्रसंगी मुख्याध्यापक के.के. फडतरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीची विद्यार्थिनी पायल देशमुख हिने, तर आभार विद्यार्थिनी रुत्वी नाईक हिने मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देवेंद्र पाटील, प्रियांका ठाकूर, सर्व शिक्षक आणि दहावीतील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

Exit mobile version