। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
श्रीपंत भक्त मंडळ संचलित गुरुवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठान पेझारी यांच्या वतीने देण्यात येणारे प्रतिष्ठेचे गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानचे सन्मान पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. दत्त मंदीर पेझारी येथे 10वाजता पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. त्यात निवड झालेले, निषाद सामाजिक व सांस्कृतीक मंडळ अलिबाग शाखा पेझारीचे जितेंद्र कुमार पाटील (नाट्य अभिनेता) पेझारी वी. वा. फाउंडेशन जिल्हा उपाध्यक्ष तसेच शिल्पा काकडे (नाट्य अभिनेत्री) विभागीय कार्यशाळा रामवाडी पेण, संचालीका निषाद शाखा पेझारी या दोन्ही कलाकारांची गुरुवर्य सुभानराव राणे (नाट्य कला) या पुरस्कारासाठी निवड झाल्याने निषाद मंडळाचे सर्वेसर्वा विक्रांत वार्डे वि.वा. फाउंडेशन जिल्हा अध्यक्ष संकल्प केळकर यांनी दोन्ही कलाकारांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
तसेच निषाद शाखा पेझारी अध्यक्ष प्रमोद पाटील, पटकथा संवाद लेखक सुभाष इंदुलकर, सचिव सचिन शिंदे व इतर सभासद मुकेश नाईक, मोरेश्वर मोकल, मानवी निर्गुण, प्रतिमा पुरो, मयुरी नाईक, दीपाली पाटील या सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.






