। अलिबाग । वार्ताहर ।
खारपाडा गावाच्या हद्दीत पुण्यातील आरोपी गुटखा विक्रीसाठी नेणारा टेम्पो पकडल्याची घटना घडली. खारपाडा गावच्या हद्दीत मुंबई-गोवा हायवे रोडवर खारपाडा चौकीजवळ आरोपी रा.काटेड, ता.जुन्नर, जि.पुणे याने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला विमल नावाचा गुटखा सुगंधी तंबाखू व पान मसाला असा नशा कारक पदार्थ विक्री करण्याकरीता टेम्पोने वाहतूक करीत असताना आढळला. तसेच वाहतूक करताना पोलिसांनी पकडू नये यासाठी पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने मालाची खोटी पावती तयार करून फसवणूक केली. सदर गुन्ह्यातील 21 लाख नऊ हजार नऊशे एंशी रुपये किंमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला. याबाबत दादर सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
21 लाखांचा गुटखा जप्त
