। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तळोजा सेक्टर-9 भागातील एका गाळ्यावर छापा मारुन सुमारे 9 लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा व सव्वा लाखाची रोख रक्कम जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी गुटख्याचा साठा करून ठेवणार्या महमद हमजा महमद शाहिद खान (26) आणि अरफान सिराज अहमद शेख (22) या दोघांना अटक केली आहे. या गुटख्याचा साठा त्यांनी कुठून आणला, याबाबत अमली पदार्थ विरोधी पथक अधिक तपास करत आहे.
वेगवेगळ्या कंपनींचा प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी तंबाखु व सुगंधी सुपारी विक्री करण्यासाठी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि वासीत आली सय्यद, पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगे व त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा मारून ही कारवाई केली. या प्रकरणी महमद हमजा खान व अरफान शेख यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.