खुलेआम गुटखा विक्री

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यात अवैध गुटखा विक्रीला ऊत आला आहे. एवढंच नाही तर काही गुटखा विक्रेते होलसेलर बनले असून, तालुक्यातील खेड्या-पाड्यात गुटखा पुरवण्याचा काम सुरू केलं आहे. महाराष्ट्र सरकारने गुटखा विक्री वर बंदी आणली, मात्र ही बंदी कागदावरच असल्याचं दिसून आलं आणि असाच गुटखा व्यवसाय तालुक्यात जोरात सुरू आहे. पोलीस आणि अन्न प्रशासन विभागाच्या आशीर्वादाने या परिसरात सर्रासपणे गुटखा विक्री सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होत असताना, उरणमध्ये मात्र कारवाई होताना दिसत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version