किराणा दुकानातून गुटखा जप्त

| रसायनी | प्रतिनिधी |

रसायनी-भोकरपाडा येथील एका किराणा दुकानावर धाड टाकून पोलिसांनी तब्बल 88 हजार 968 रुपये किमतीचा केशरयुक्त विमल पान मसाला आणि गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबीचे सहाय्यक फौजदार संदीप पाटील यांना भोकरपाडा येथील एका किराणा दुकानात प्रतिबंधित गुटखा साठवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. याआधारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या पथकाने या दुकानावर छापा टाकला. तपासणीदरम्यान, दुकानात शासनाने बंदी घातलेला केशरयुक्त विमल पान मसाला आणि गुटखा विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ 88 हजार 968 रुपये किमतीचा सर्व साठा जप्त केला. या प्रकरणी दुकानाचे मालक नितेश ज्ञानेश्वर पाटील (30) आणि गुटखा पुरवठादार दिनेश मकीजा (रा. बदलापूर) यांच्याविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version