ज्ञानांकुर शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश

| कोलाड | प्रतिनिधी ।

रोहा तालुक्यातील एमडीएम फ्युचर स्कूल चिंचवली येथे मंगळवार दि.23 सप्टेंबर रोजी तालुकास्तरिय पावसाळी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धेत ज्ञानांकुर इंग्लिश माध्यम शाळा खांब येथील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन करून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या स्पर्धेतज्ञानांकुर इंग्लिश माध्यम शाळेच्या 14 वर्षाखालील मुलींमध्ये थालीफेक स्पर्धेत स्वरा धामणसे प्रथम, 17 वर्षाखाली मुलींमध्ये थालीफेक स्पर्धेत संस्कृती चितळकर द्वितीय, 17 वर्षाखालील मुलांमध्ये थालीफेक स्पर्धेत कर्तव्य लोखंडे द्वितीय, तसेच 14 वर्षाखालील मुलांमध्ये 4*100 रिले स्पर्धेत रुद्र शिंदे, स्मित आमणकर, अंशु चव्हाण, वृषभ महाडिक, द्वितीय,धावण्याच्या (1500 मी.) स्पर्धेत विघ्नेश नाकटे तृतीय, तसेच 17 वर्षाखालील मुलींमध्ये उंच उडी स्पर्धेत अक्षरा मरवडे द्वितीय, 14 वर्षाखालील मुलांमध्ये स्मित आमणकर द्वितीय,अंशु चव्हाण तृतीय, क्रमांक पटकावले. या यशासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे रिया लोखंडे व ज्ञानेश्वर महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version