ज्ञानवापी मशिदीची सुनावणी स्थगित

। वाराणसी । वृत्तसंस्था ।
ज्ञानवापी मशीद प्रकरणात पुढील सुनावणी शुक्रवारी घेतली जाईल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच वाराणसीतील ट्रायल कोर्टाला या दरम्यान पुढील कार्यवाही स्थगित करण्याचे आदेश पारित केले आहेत. दरम्यान, मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष सहाय्यक आयुक्तांचा अहवाल गुरुवारी वाराणसी न्यायालयासमोर सादर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीबाबत जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार्‍या याचिकांवर नोटीस जारी केली होती. तसेच मशिदीच्या आतील भागात, म्हणजेच त्या ठिकाणी कथित शिवलिंग असल्याचे सांगितले जात होते, त्यावरच हिंदू पक्षकारांचा दावा असल्याचं म्हटलं होतं. मात्र, या प्रकऱणाने पेट घेतल्यानंतर मशिदीचा परिसर सील करण्यात आला. तरीही मुस्लिमांना मशिदीत प्रवेश करण्यास आणि प्रार्थना करण्यास प्रतिबंध घालून नये, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.

Exit mobile version