। चिरनेर । प्रतिनिधी ।
वशेणी येथील रवी किरण हॉस्पिटल, उरण मॅग्नस हॉस्पिटल उलवे आणि इतिहास संपादकीय मंडळ वशेणी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.24) स्त्री रोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर वशेणी येथील रवी किरण हॉस्पिटल येथे सकाळी 10 वाजता आयोजीत करण्यात आले आहे. या शिबिरात स्त्री रोग तज्ञांकडून मोफत पी.ए.पी, एस.एम.इ.ए.आर. तपासणी तसेच गर्भाशय आरोग्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी रविकिरण हॉस्पिटल 9821266670 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.