हनुमान व गणपती मंदिराचा लोकार्पण सोहळा
| अलिबाग |विशेष प्रतिनिधी |
रस्ते कोणी मंजुर केले नारळ कोणी फोडले याच्या पेक्षा रस्ता होण आवश्यक आहे. कागदावर विकास आहे पण प्रत्यक्षात दिसत नाही. अलिबाग रोहा रस्ता हा आपण आमदार असताना जयंत पाटील यांच्यासोबत आम्ही प्रयत्न केले. हे लोकांना समजले पाहीजे. बांधकाम मंत्री रविंद चव्हाण यांनी म्हटले की, या रस्त्याला कोण आडवा येईल त्याला सरळ करेन, पण तुम्ही पालकमंत्री होतात तेव्हाच याची वर्क ऑर्डर केली असती तर रस्ता आतापर्यंत पुर्ण झाला असता, असा टोला शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केले.
आ. जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून ग्रामस्थ मंडळ गोंधळपाडा यांच्यावतीने चेंढरे येथील हनुमान व गणपती मंदिराचा लोकार्पण सोहळा शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, पंचायत समितीच्या माजी उपसभापती मीनल माळी, सुरेश घरत, चेंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच प्रणिता म्हात्रे, माजी उपसरपंच अॅड परेश देशमुख, यतीन घरत, माजी सरपंच राम पाटील, वेश्वीचे माजी उपसरपंच नरेश पडियार, चेंढरे ग्राम पंचायत सदस्य सुशांत फळसणकर, अस्मिता म्हात्रे, अहिल्या पाटील, कुरूळ ग्रामपंचायत सदस्य अवधूत पाटील, ग्रामसेवक निलेश गावंड आदी उपस्थित होते.
माजी आमदार पंडित पाटील पुढे म्हणाले की, जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत यांनी उत्कृष्ट काम करत आमदार कसा असावा हे दाखवून दिले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडले नुसते मांडले नाही तर सरकारला निर्णय घेण्यासा भाग पाडले. आपल्या कामाचे श्रेय घेतले तरी आपले नाव जनतेच्या हृदयात आहे, असेही ते म्हणाले. चित्रलेखा पाटील यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांनी अल्पावधीत चांगले काम केले. लक्ष्मीच्या पावलांच्या आहेत. चित्रलेखा पाटील यांनी रोजगार मेळावा घेऊन चांगले काम केले आहे.
लोकशाहीत विरोधी पक्ष असणे आवश्यक आहे. पुर्वी काँग्रेसचे सरकार असताना 18 टक्के जीएसटी नव्हता तेंव्हा शाळेत विद्यार्थी होते शिक्षक होते आज 18 टक्के जीएसटी घेऊन देखील राज्य सरकार नोकर भरती करत नाही. 2000 मध्ये आम्ही सत्तेत असताना जी भरती झाली त्यानंतर राज्य सरकारने भरती केली नाही असे सांगीतले. वेगळया पद्धतीच्या राजकारणामुळे आज बीजेपी मध्ये जायची रांग लागली आहे की बसायला पण जागा नाही मात्र काँग्रेसने कधी खालच्या पातळीवर राजकारण केले नाही. या देशावर गांधी घराण्याचे फार मोठे उपकार आहेत. त्यांच्या घरातील दोन चार व्यक्तींनी देशासाठी बलिदान दिले आहे. राहूल गांधींना किरकोळ वादातून दोन वर्षे शिक्षा होऊन त्यांचेल निलंबन करणे हे दुर्दैव आहे. 2024 मध्ये भारतीय जनता परिवर्तन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोंधळपाडा ग्रामस्थांचे कौतुक करताना गोविंदाचे उदाहरण त्यांनी दिले.चेंढरे गोंधळपाडा येथील रस्त्यासाठी 25/54 मधून 20 लाखांचा निधी मंजुर करण्याचे आश्वासन यावेळी पंडित पाटील यांनी दिले.
शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांंनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शेकापने आमदार म्हणून प्रत्येक गावाच्या विकासासाठी कायम निधी दिला आहे. आपण खाजगी निधी देखील देतो ज्यातून गावागावी ग्रामस्थांचा विकास होईल. मंदिर, रस्ते पाणीपुरवठाा व्यक्तीगत कामांसाठी देखील हात आकडता घेत नाही. जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी पाठपुरावा करणारा लोकांशी नाळ जुळलेला कार्यकर्ता हवा असतो अजित माळी
यांनी चांगला पाठपुरावा केल्यामुळे सुंदर मदिर उभे राहीले असे सांगून त्यांनी अजित माळी यांचे कौतुक केले. इथल्या रस्त्याचे काम देखील पुर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विधिमंडळ अधिवेशनात जिल्हा आणि तालुक्याचे तसेच संपूर्ण राज्यभरातील खर्या अर्थाने सर्वाधिक प्रश्न रायगडचे भाग्यविधाते आ. जयंत पाटील यांनी मांडले. आणि हे सर्व रेकॉर्डवर असल्याने कोणीही नाकारु शकणार नाही. असे सांगत मागील चार ते पाच वर्षांप्रमाणे केलेल्या कामांप्रमाणे आपण काम करु आपल्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात या तालुक्यात 50 कोटींचा खाजगी निधी विविध कामांसाठी आणला याचा आपल्याला अभिमान वाटला पाहीजे. व्यक्तीगत कामांसाठी, सायकल वाटपासाठी शाळांसाठी निधी आणण्यात आपण यशस्वी झालो. चेंढर्यातील नाटयगृहासाठी निधी आणला असून पुन्हा एकदा नव्या दिमाखात नाटयगृह उभा राहून अलिबागकर तसेच कलाकारांसाठी पुन्हा नाटयगृह सुरु करुन देणार असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी संजय पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक अजित माळी यांनी केले. तर सुत्रसंचल अमित पाटील यांनी केले तर आभार यतीन घरत यांनी मानले. स्वागत नरेश पडियार, दिलीप सुद, मोहन पडियार, राजू जाधव यांनी केले.