कृषीवल आयोजित हळदीकुंकू समारंभ

7 एप्रिल रोजी पीएनपी नाट्यगृहात रंगणार सोहळा
मराठी सिनेतारका लावणार हजेरी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कृषीवल आयोजित दिवस मानाचा… सौभाग्याचा… हळदीकुंकू सोहळा गुरुवार, दि. 7 एप्रिल रोजी अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात मराठी सिनेतारकांच्या विशेष उपस्थितीत दुपारी चार वाजता रंगणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले नव्हते. यंदा निर्बंधमुक्तीनंतर महिलांना सौभाग्याचे वाण लुटण्याची संधी शेकापच्या महिला जिल्हा आघाडीप्रमुख तथा कृषीवलच्या कार्यकारी संचालक चित्रलेखा पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन प्राप्त करुन दिली आहे.

या हळदीकुंकू कार्यक्रमास सोनी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्राजक्ता माळी, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब तसेच ‘बॉस माझी लाडाची’ फेम भाग्यश्री लिमये आणि ‘असे हे सुंदर आमचे घर’ फेम संचिता कुलकर्णी आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत. या हळदीकुंकू कार्यक्रमामुळे महिलांना एक वेगळीच पर्वणी मिळणार आहे.

गोरेगावंमध्ये 9 एप्रिलला आयोजन
गोरेगाव येथील राजमाता जिजाऊ मैदानावर 9 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, शेकापच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, जि.प. सदस्य आरती मोरे यांच्यासह स्वराज्य सौदामिनी फेम अभिनेत्री स्वरदा ठिगले, बॉस माझी लाडकी फेम भाग्यश्री लिमये आणि अभिनेत्री संचिता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

खालापूरमध्ये 8 एप्रिलला लुटा वाण
खालापूरमध्ये हळदीकुंकूवाचे वाण लुटण्यासाठी शेकाप महिला आघाडी तथा कृषीवलच्या कार्यकारी संचालक चित्रलेखा पाटील यांनी महिलांना संधी दिली आहे. 8 एप्रिल रोजी खालापूर फाटा मैदान, श्रीकृष्ण पेट्रोलपंपाच्या जवळ दुपारी 4 ते सायं.7 वाजेपर्यंत हळदीकुंकू कार्यक्रामचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ‘सुंदर आमचे घर’ फेम सुकन्या मोने, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ फेम स्वरदा ठिगळे, ‘तुमची मुलगी काय करते?’ फेम जुई भागवत आणि मधुरा वेलणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version