नारीशक्ती महिला संघटनातर्फे हळदीकुंकू

। उरण । प्रतिनिधी ।

महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करणार्‍या व सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या राष्ट्रीय नारिशक्ती महिला संघटनेतर्फे मौजे रोडपाली नवी मुंबई येथे हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात मनमोहन यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, राष्ट्रीय नारीशक्ती महिला संघटना अध्यक्ष आरती बेहरा या महिलांच्या विकासासाठी 24 तास काम करित आहेत. भारताचे गुजरात राज्य सोडून सर्व राज्यात महिला विकासाचे काम चालू आहे. सर्व मिळून 8 लाख 75 हजार जनसंख्या राष्ट्रीय नारिशक्ती महिला संघटनेमध्ये काम करीत आहेत.

अनेक तरुणीचे पलायन झाले आहे. त्या मानवी तस्करी करणार्‍या लोकांच्या कैदीत अडकलेल्या महिला व युवती यांची सुटका करून त्यांच्या घरी नेणे, विधवा महिलांना पेन्शन मिळवून देणे, महिलांना मारणार्‍या दारुड्या, नशेडी आणि जुगारी पतीच्या विरोधात आवाज उठविणे, विखुरलेल्या परिवाराला एकत्र करणे, त्यांना सुधारण्याचे काम संघटनेच्या अध्यक्ष आरती बेहरा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. असे मत व्यक्त करत मनमोहन महाराज यांनी नारी वाचवा देश वाचवा, नारी वाचवा नारीला शिकवा, नारीचा सन्मान करा, नारीशक्ती संघटनेमध्ये सामील व्हा असे आवाहन महिलांना केले.

Exit mobile version