कामथ येथे हळदीकुंकू समारंभ

| सुतारवाडी | वार्ताहर |

रा.जि.प. शाळा कामथ येथे माता पालक व ग्रामस्थ भगिनीच्या उत्स्फूर्त सहभागाने सुवासिनीचा पवित्र सण मकरसंक्रांत निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम पार पाडला.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली अरविंद गुंजोटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने समारंभास सुरुवात झाली. यावेळी उपस्थित महिला वर्गाच्या अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये बालदीत बॉल टाकणे, चमचा गोटी, डोळे बांधून नारळ फोडणे, काठी पकडा अशा विविध खेळा बरोबरच त्यांनी लेझीम नृत्याचा आनंद लुटला.

बालदीत बॉल टाकणे- हौशी वाघमारे, चमचा गोटी- मेघा निळेकर, नारळ फोडणे- सुविला सानप, काठी पकडा- सोनाली सानप यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. तसेच, विविध वस्तू वापरून योगिता निळेकर हिने काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधत होती.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तपासणी पथकाने शाळेचे कौतुक केले. जमलेल्या मान्यवरांना वाण म्हणून भेटवस्तू व नाष्टा देण्यात आले. कार्यक्रमास साहाय्य करणाऱ्या सेजल सुतार, सविता निळेकर, दर्शना महाडिक, संजना सानप यांचे तसेच उपस्थितीचे आभार मानून समारंभाची सांगता करण्यात आली.

Exit mobile version