लेक वाचवा देश वाचवा अंतर्गत हळदीकुंकू

| अलिबाग । वार्ताहर ।
जनता शिक्षण मंडळ प्राथमिक शाळा सारळ या शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जंयतीपासून मुलींसाठी वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच परिकाक म्हणून सोमवार (16) रोजी पालकांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. यावेळी लेक वाचवा देश वाचावा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी जनता शिक्षण मंडळ अलिबागच्या संचालिका शैला पाटील, प्राथमिक व पूर्वप्रथमिक स्थानिक शाळा समिती अध्याक्षा भावना पाटील, माजी पंचायत समिती सदस्या कुंदा गावंड, अर्बन बॅकेच्या संचालिका शिवानी नाईक, शरयू कोयंडे, अमृता नाईक तसेच सारळ माध्यमिक व प्राथमिक, पूर्व प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकवृंद, महिला पालक, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

Exit mobile version