खोपोली लायन्स क्लबचे समाजकार्याचे अर्धशतक

। खोपोली । वार्ताहर ।
खोपोली शहरात सामजिक कार्य करण्यासाठी लायन्स क्लब ची स्थापाना झाली या छोट्याशा रोपट्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याने गोल्डन ज्युबिली मोठ्या उत्सव कपॉलिन रिसॉर्ड मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी 50 वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेत लाखो लोकांची सेवा केल्याचे मांडून जवळपास सहकार्य करणार्‍या सामजिक संस्था, कार्यकर्ते सह कारखानदारी अशा 61 जणांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लायन्स जिल्हा प्रमुख लुनकरण तावरी अध्यक्ष महेश राठी, सेक्रेटरी शिल्पा मोदी ( चुरी) खजिनदार कल्पेश शाह लायन्स क्लब ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट चे राजेंद्र केजरीवाल उपाध्यक्ष दिलीप पोरवाल यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी या 50 वर्षाच्या वाटचालीत केलेल्या कायमचा आढावा लायन्स अल्टा कंपनीचे व्यवस्थापन अधिकारी बाळाराम म्हात्रे यांनी सादर केला.

यावेळी जय किशन जाखोटीया, आर के केजरीवाल, ए के खंडेलवाल, अल्टा लॅबोरेटरीज कंपनीच्या गीता धोटे परिवार, गार्गी चे राज गावडे, आयुष्य अनिल मित्तल, माजी नगराध्यक्षा सुमन औसरमल, माजी दत्तात्रेय मसुरकर, मुख्याधिकारी अनुप दुरे,माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, खालापूर प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, डॉ आय सी बोरणा डॉ जोशी, डॉ गोवंडे, डॉ पाटील, डॉ आशिष नाईक, डॉ सुनील देवडीकर, हेल्थ फाऊंडेशन अलिबाग, पोलीस निरीक्षक अनिल विभूते, केरला क्लचर्स सोसायटी, रोटरी क्लब खोपोली, अपघात ग्रस्त संस्था, सहज सेवा संस्था, मुस्लिम वेल्फर असोशियन, पंकज मोरे, यशवंती हायकर्स, बुज लाप्टर क्लब, हनुमान मित्र मंडळ, ब्राह्मण सभा खोपोली, जेष्ट नागरिक सभा, अजित भोसले कटर्स, प्रल्हाद अत्रे, खेमंत टेलर, पत्रकार मित्र प्रेस क्लब यासह अन्य नागरिकांना सन्मानित करण्यात आले.

सूत्रसंचालन सचिन बोरणा यांनी केले तर विशेष म्हणजे पुष्पगुच्छ यावर खर्च न करता त्याच्या खर्चाचा धनादेश शॅलोम एज्युकेशन या अंध मुलांच्या संस्थेला देण्यात आले. यावेळी गीता धोटे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

Exit mobile version