सामनावीर पुरस्कारासाठी अर्धा एकर जमीन

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू शेफन रुथरफोर्डने नुकत्याच झालेल्या ग्लोबल टी-20 कॅनडा लीगमध्ये विचित्र पुरस्कार मिळाला. साऊथपॉने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॉन्ट्रियल टायगर्ससाठी धडाकेबाज खेळी खेळली आणि सरे जग्वार्सचा पराभव करून संघाला चषक उंचावण्यास मदत केली. शेरफेन रुथर फोर्डच्या 29 चेंडूंत 38 धावांच्या शानदार खेळीने त्यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला. त्याला पुरस्कार म्हणून अमेरिकेत अर्धा एकर जमीन दिली गेली आहे.

तत्पूर्वी, मॉन्ट्रियल टायगर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सरे जग्वार्सला प्रथम फलंदाजी दिली. जग्वार्सने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 130 धावा केल्या. जग्वार्ससाठी जतिंदर सिंगने 57 चेंडूत 56 धावा केल्या. अयान खानने अवघ्या 15 चेंडूत 26 धावा केल्या. मॉन्ट्रियल टायगर्सच्या गोलंदाजांमध्ये, आयन खानने 4 षटकांत 21 धावा देत 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात मॉन्ट्रियल टायगर्सने संयमाने 131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 षटकांत 5 बाद 135 धावा केल्या.

Exit mobile version