मुंबईत अर्धमॅरेथॉन स्पर्धा

पूनम सोनूने दुसरी

| मुंबई | वृत्तसंस्था |

मुंबईत पार पडलेल्या अर्धमॅरेथॉनमधील महिला विभागात दोन खेळाडूंमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील बुलडाण्यामधील पूनम सोनूने व अम्रिता पटेल यांनी 1 तास 19 मिनिटे व 20 सेकंद अशी एकसारखीच वेळ देत अर्धमॅरेथॉन शर्यत पूर्ण केली; पण अम्रिता हिला पहिला क्रमांक व पूनम हिला दुसरा क्रमांक देण्यात आला. या शर्यतीमध्ये कविता यादव हिने 1 तास 20 मिनिटे व 45 सेकंद अशी वेळ देत शर्यत पूर्ण केली व तिसरे स्थान मिळवले. नाशिकमध्ये विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. सध्या दक्षिण आशियाई क्रॉस कंट्री व आशियाई स्पर्धेसाठी सज्ज होत आहे.

Exit mobile version