‘आपत्ती निवारणासाठी हॅम रेडिओ उपयुक्त’

जेएसएममध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर संपन्न

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

आज जे.एस.एम. महाविद्यालयात नैसर्गिक आपत्तीविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हॅम रेडिओ स्टेशन कशा प्रकारे मदतीस येते व त्याचा काय फायदा होतो हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावे, या उद्देशाने हॅम रेडिओ स्टेशन व अपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. निळकंठ शेरे, कला शाखा प्रमुख प्रा. प्रकाश दातार, थाडोमल इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. चंद्रशेखर सिव्हिल डिफेन्स डिव्हिजनल वार्डन डॉ. राहुल घाटवळ, सिनिअर हॅम ऑपरेटर दिलीप बापट, परसी जटावल, चारुदत्त उपलप, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. सुनील आनंद, जिमखाना विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिखले, एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील व प्रा. डॉ. अनिल यांनी प्रशिक्षण शिबिरास शुभेच्छा दिल्या.

प्रा. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये हॅम रेडिओ स्टेशन कसे उपयोगी ठरते याविषयी माहिती दिली. तसेच या शिबिराचे महत्त्व आलव उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर सिनियर हॅम रेडिओ ऑपेरेटर दिलीप बापट यांनी हॅम रेडिओ स्टेशन चे तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली तसेच रायगड जिल्ह्यात आलेल्या निसर्ग वेळी जेव्हा सर्व जनसंपर्क माध्यमे विस्कळीत झाली होती त्यावेळी हॅम रेडिओ स्टेशनचा फायदा कसा झाला व या खूप मोठी जीवितहानी टाळली गेली, असे सांगितले. तसेच दिलीप बापट यांनी निसर्ग वादळाच्या वेळीचे काही अनुभव सांगितले.

परसी जटावल आणि चारुदत्त उपलब यांनी विद्यार्थ्यांना हॅम रेडिओ स्टेशन यंत्रणा कशा प्रकारे कार्यान्वित होते प्रात्यक्षिक दाखवले. तसेच पूर, वादळ, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जनसंपर्क माध्यमे विस्कळीत झाल्यावर आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करण्यासाठी कसा उपयोग होतो याविषयी मार्गदर्शन केले आणि विदयार्थ्यांच्या प्रश्‍नाचे व शंकाचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले.

Exit mobile version