। अलिबाग । प्रतिनिधी ।
गौरी, गणपती सणानिमित्त सोलापूरच्या भाऊराया हॅण्डलूम यांचे हातमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन अलिबाग रायगड जिल्हा परिषद अधिकारी गायकवाड व सुरेश म्हात्रे, जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
हे प्रदर्शन व विक्री डोंगरे हॉल सार्वजनिक वाचनालय पोस्ट ऑफिस समोर अलिबाग दिनांक 21 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या हातमाग कापड प्रदर्शनाचा अलिबागवासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रदर्शनाचे प्रमुख पुरुषोत्तम पोतन यांनी केले आहे. प्रदर्शनात कॉटन साडी, इरकल साडी, मधुराई साडी, खादी साडी, धारवाड साडी, मधूराई सिल्क साडी, सेमी पैठणी, खादी सिल्क साडी, प्रिंटेड ड्रेस, वर्क ड्रेस मटेरियल, पटोला ड्रेस, कॉटन परकर, टॉप पिस, सोलापूर चादर, बेडशीट, नॅपकिन, सतरंजी, पंचा, टॉवेल, वुलनचादर, दिवाणसेट, प्रिंटेड बेडशीट, पिलो कव्हर, लुंगी, व शर्ट, कुर्ता, बंडी, गाहून, विविध प्रकारच्या विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. तसेच, सुती व खादी कापडाच्या विक्रीवर 20 टक्के सूट असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.







