रायगडात हनुमान जयंती उत्साहात साजरी

गेली दोन वर्षे कोरोना काळात कोणतेही सण उत्सव साजरा करता आले नाहीत. मात्र या वर्षी कोरोनाचे निर्बंध हटल्याने विविध सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येऊ लागले आहेत. यावर्षी श्री हनुमान जन्मोत्सव संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी विधीवत पूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जन्मोत्सव साजरा
उरण:
यावर्षी श्री हनुमान जन्मोत्सव संपूर्ण उरण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुळेखंड, करंजा, पागोटे, कोटनाका आदी ठिकाणी श्री हनुमान मंदिरात भाविक भक्तांनी दर्शनासाठी खूप मोठी गर्दी केली होती. शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या उरण शहरातील गणपती चौकातील हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हरिनाम सप्ताह
खांब-रोहे:
गेल्या कित्येक वर्षांची यशस्वी परंपरा कायम राखत धामणसई येथे संपन्न झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी विधान परिषद आ.अनिकेत तटकरे यांनी रायगड भूषण बाळाराम महाराज शेळके यांच्या किर्तनसेवेप्रसंगी सदिच्छा भेट दिली असता आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत पिंगळसई माजी सरपंच अनंत देशमुख, अप्पा देशमुख, उपसरपंच तानाजी देशमुख, युवा नेते जगदीश देशमुख, महेश तुपकर, मारूती तुपकर, नंदा शेठ खांडेकर, माजी सरपंच महादेव सानप, सरपंच नेहा जंगम, उपसरपंच सुशील घाटवळ, शेखर कदम, हेमंत कडव आदी मान्यवर उपस्थित होते.

आकर्षक रोषणाई
रेवदंडा:
पारनाका येथील मारूती मंदिरात हनुमान जयंती निमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली असून श्री हनुमान जयंती निमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी पहाटे साडेपाच ते साडेसात पर्यत अनंत केळकर यांचे श्रींच्या जन्माचे किर्तन, लघूरूद्र अभिषेक, भजन, महाआरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच श्री मारूती देवस्थान कमिटी व रेवदंडा ग्रामस्थ यांच्या सयुक्त विद्यमानाने अनंत नातू यांचे प्रवचन, व पुणे येथील राजस्थानी भजनी मंडळ यांची भजन संध्या अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीवर्धनमध्ये सजावट
श्रीवर्धन:
श्रीवर्धन येथील श्री कालभैरव मंदिर येथे योगेश्‍वरी व कालभैरवनाथाची फुलांनी केलेली आकर्षक सजावट केली होती. दरवर्षी हनुमान जयंती ह्या दिवशी भैरवनाथ मंदिरात चैत्रीचा उत्सव साजरा केला जातो. अनेक भक्तगण येथे आवर्जुन उपस्थिती लावतात.

जन्मोत्सवानिमित्त कथा
मुरूड:
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. मुरुड तालुक्यातील तेलवडे गावातील श्री हनुमान मंदिरामध्ये श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पहाटे पासुनच श्री हनुमानाच्या जन्मोत्सवाची कथेच्या किर्तनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सुर्योदयावेळी 6:22 नंतर श्री हनुमान जन्मकाळ करण्यात आला, जन्मकाळ होताच पुष्प वर्षाव करुन सुंटारा, सुकामेवा, मिठाई प्रसाद म्हणून वाटले. यावेळी विधीवत श्री हनुमानाच्या मुर्तीला अभिषेक करुन पुजन करण्यात आले. त्यानंतर सर्व भाविकांंनी दर्शन घेतले आणि या मुर्तीची पाळण्यात स्थापना करण्यात आली. यावेळी उपस्थित सुवासिनींनी पाळण्याला झोके देत पाळणा गीत गाण्यात आला नंतर आरतीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

भाविकांची गर्दी
पनवेल:
पनवेलच्या पंचमुखी मंदिरात मोठ्या रांगा लाऊन लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी भाविकांच्या चेहर्‍यावर प्रसन्न भावना दिसत होत्या.

भाविकांनी घेतला महाप्रसादचा लाभ
भाकरवड:
अलिबाग तालुक्यातील भाकरवड येथे श्री हनुमान जन्मोत्सवनिमित्त रायगड भूषण विध्याधर महाराज नीळकर देहेन यांच्या नेतृत्वाखाली सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था या पाटील कुटुंबाकडून करून या सप्ताहात भाविकांनी सहभाग घेऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

Exit mobile version