मुरुडमध्ये हनुमान जयंती उत्साहात

। मुरुड-जंजिरा । प्रतिनिधी ।

शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या मुरुड तालुक्यातील खारआंबोली या गावात हनुमान जयंतीला पहाटे 6 वाजता गावच्या देवळात जन्मकाळ झाला. जन्मकाळ होताच गावातील बेन्जो पथके व खुल बाजा पथके वाजायला सुरुवात झाली. तो आवाज ऐकताच तरुण मंडळी देवळाभोवती म्हदेवावची काठी हातावर घेऊन फिरवायला सुरु केली. देवळात घंटानादात गावातील महिला पाळणा बोलत, गावातील जेष्ठ भजन गाऊन हनुमान जन्मकाळ आनंदात साजरा केला.

दरवर्षी म्हदेवावची काठी तरुण बलदंड युवक उचलण्याची प्रथा आहे. ती काठी खूप उंच व जड असल्याने 4 जण काठीला दोरी बांधून तोल सांभाळण्याचे काम करतात. ही प्रथा सुरु राहावी म्हणून यावर्षी लहान मुलांनी छोटी काठी बनवून तिला रोषणाई करून देवळाभोवती फिरवली. यावेळी ही लहान मुले यात्रेचे प्रमुख आकर्षण बनले. तसेच, गावची परंपंरा जीवापाड सांभाळण्याचे काम ते करत होते.

रात्री 12 वाजता येथे मारुतीरायांची गावातून पालखी निघते. यामध्ये खार आंबोलीच्या वीर बजरंग व्यायामशाळेचे व्यायामपटू दांडपट्टा, मल्लखांब, लाठी, छाटी असे शारीरिक कसरतीचे प्रयोग सादर करतात.

Exit mobile version