। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
फळांचा राजा आंबा अशी ओळख असणारा हापूस आंबा रायगडच्या विविध तालुक्यातील बाजारपेठेत दाखल झाला आहे. हापूस आंबा बाजारपेठेत विक्रीसाठी येण्यासाठी एप्रिल महिना उजाडतो. परंतु, या हंगामातील हापूस आंबा मुंबईमध्ये जानेवारी महिन्यात दाखल झाला. याची किंमत एका डझनला 3,850 रुपये म्हणजेच एक आंबा 321 रुपये किंमतीचा होता. परंतु, हाच हापूस आंबा रायगडमधील विविध तालुक्याच्या ठिकाणी दाखल झाला असुन याची किंमत एका डझनला 1,200 रुपये म्हणजेच एक हापूस आंबा 100 रुपये किंमतीला मिळत आहे. मार्च महिन्याच्या शेवटी याची आवक वाढणार असल्यामुळे हा आंबा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात उपलब्ध होईल, असे आंबा विक्रेतांकडून सांगण्यात येत आहे.