कॅमलिन कंपनीच्या अधिकार्‍याकडून महिला कामगाराचा विनयभंग

| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील चावणेजवळच्या कोकीयो कॅमलिन कंपनीतील एका अधिकार्‍याने महिला कामगाराचा विनयभंग केल्याची तक्रार याच कंपनीत काम करणार्‍या महिलेने रसायनी पोलीस ठाण्यात केली आहे. याबाबत कॅमलिन कंपनीच्या अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅमलिन कंपनीमध्ये काम करणार्‍या एका महिलेशी कंपनीमधील अधिकारी दिलीप तायडे हा गेल्या काही महिन्यांपासून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत होता. याबाबत वारंवार कंपनीच्या व्यवस्थापनाकडे तक्रार करुनही तायडेच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर पीडित महिलेने रसायनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला व गोरक्षनाथ बाळवडकर अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version