। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील मौजे आंग्रेंनगर येथे विवाहित महिलेला माहेरून पैसे आणण्यासाठी छळ होत असल्याची तक्रार विवाहित महिला हिने रेवदंडा पोलीस ठाण्यात केली आहे. याबाबतचे वृत्त असे की, रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 1 जानेवारी 2013 ते दि. 19/09/2021 दरम्यान महिला फिर्यादी व आरोपीत नं.01 दोन्ही रा.अंग्रेनगर अलिबाग यांचे सन 2012 साली लग्न झालेले असुन लग्न झाल्यानंतर सन 2013 पासुन आरोपीत नं.01,02 व 03 यांनी फिर्यादीस वेळोवेळी माहेरून पैसे आणण्याची मागणी केली असता त्यास फिर्यादीने नकार दिल्याने फिर्यादीस मानसिक व शारिरीक छळ करू लागले.त्यानंतर सन 2019 मध्ये आरोपीचे एका विवाहीत महिलेच्या सोबत प्रेम संबंध ठेवल्याने व तिचे सोबत राहत आसल्याने त्यांचे प्रेम संबंधास फिर्यादीने विरोध केला असता त्याचा राग आरोपीत नं.01 ते 04 यांना येवुन त्यांनी वेळेवेळी फिर्यादीस शिवीगाळी, दमदाटी व मारहाण करून फिर्यादीचा मानसिक व शारिरीक छळजाच केला.
याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला सहाय्यक फौजदार सविता गोसावी ह्या पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
दरम्यान, गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार्या शेकापक्षाच्या महिला सदस्यांना शिवीगाळ करणार्या मस्तवाला सदस्याविरोधात संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. विकासाला आडकाठी करणार्या अशा झारीतल्या शुक्राचार्यांना जनताच धडा शिकवेल अशी अपेक्षा देवयानी पाटील यांनी व्यक्त केली.