| रसायनी | वार्ताहर |
दांड-रसायनी रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणा-या वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे. या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. रस्त्याची चाळण झाल्याने नागरिक, वाहनचालक हैराण झाले आहेत.
दांड-रसायनी रस्ता काही वर्षांपूर्वी बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर भारत उद्योग लिमिटेड कंपनीला देण्यात आला होता.त्यामुळे या रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी या कंपनीवर होती. मात्र काही कारणास्तव येथील टोलनाका सरकारने बंद केल्यामुळे सदर रस्त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्याने दुर्लक्ष होत राहील्याने दांड -रसायनी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसराकडे ये-जा करणा-या अवजड वाहनांमुळे मोहोपाडा बॅक ऑफ इंडिया समोर,मोहोपाडा प्रवेशद्वाराजवळ, रसायनी वृंदावन रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालविताना खड्डे चुकवित असताना अनेकांचा अपघात होवून नागरिक जखमी झाले आहेत. खड्ड्यामुळे अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर काही दुचाकीस्वारांना कंबरदुखीचा त्रास झाल्याचे दिसून येते. सार्वजनिक बांधकाम खात्याने दांड-रसायनी रस्त्याचे काम न आंदोलनाचा इशारा पत्रकार राकेश खराडे यांनी दिला आहे.