हार्दिक पांड्याचे पुनरागमनाचे संकेत

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या संघाबाहेर आहे. 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान हार्दिकला दुखापत झाली होती, त्यानंतर हार्दिक बराच काळ संघाबाहेर होता. दुसरीकडे हार्दिक पांड्याही सातत्याने पुनरागमनाचे संकेत देत आहे. सध्या हार्दिक पांड्या जिममध्ये खूप मेहनत करत आहे. ज्याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हार्दिक पांड्या आजकाल स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिममध्ये खूप मेहनत करत आहे. आता हार्दिक पांड्याने वर्कआऊट करतानाचा त्याचा नवीन व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हार्दिक पांड्याने जमिनीवर एएम टू पीएम असे लिहिले आहे. म्हणजेच आता हार्दिक पांड्याने संघात पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स संघाचा नवा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता हार्दिकला स्वत:ला लवकरात लवकर तंदुरुस्त करायचे आहे. ज्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करत आहे.

Exit mobile version