| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे रेवस बोडणी गावचे एक सच्चे आणि निष्ठावान कार्यकर्ते हरीचंद्र पोशा नाखवा यांचे आज रविवार दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पाच मुली व एक मुलगा पत्नी व तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर बोडणी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.







