। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील भेंडखळ येथे शुक्रवारी (दि.12) हरीनाम सप्ताह सुरु होणार आहे. रक्षाबंधनाच्या दुसर्या दिवसापासून सुरु होणार्या सप्ताहाची स्थापना 1968 साली करण्यात आली आहे. कोणताही खंड न पडता सलगपणे हरिनाम सप्ताह साजरा करण्याचे हे 154 वे वर्षे आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी कोरोनाचे संकट असतानाही शासनाच्या नियमानुसार अंत्यत शिस्तबद्ध पद्धतीने हा सप्ताह साजरा करीत आयोजकांनी कोणताही खंड पडू दिला नाही.