| सुकेळी | प्रतिनिधी |
बाळसई गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन सोमवार( दि.22 ) ते गुरुवार (दि.25) डिसेंबर 2025 रोजी असे चार दिवसांचे आयोजन करण्यात आले आहे. या चार दिवसांमध्ये दररोज काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायणाचे वाचन, प्रवचन, हरिपाठ, किर्तन, असे कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार (दि.25) रोजी नानाजी शिरसे यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर संपूर्ण बाळसई गावातुन श्रींची पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात येईल. त्यानंतर या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद देऊन या भव्यदिव्य कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह सोहोळा साजरा करण्यासाठी बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, श्री. बेलजाई मित्र मंडळ, तसेच मुंबई मित्र मंडळ मेहनत घेत आहेत.







