खरवई येथे हरिनाम सप्ताह सोहळा

| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील खरवई गावात दि. 15 ते 22 फेब्रुवारीदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. श्री ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा प्रभू परमात्माच्या कृपेने, संताच्या पुण्याईने, ब्र.स्वा.सु.नि.गुरुवर्य.वै.ह.भ.प.बाळाराम महाराज कांबेकर, गुरुवर्य वै.ह.भ.प.गणपतबाबा जाधव, वै.ह.भ.प. चिंतामण म्हस्के यांच्या प्रेरणेने ह.भ.प.गुरुवर्य महाराज लांबे, ह.भ.प.मधुकर महाराज कालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व ह.भ.प.दिंगबर महाराज सणस यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाला 48 वर्षे पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी यावर्षी चतुर्थ तपपूर्ती सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केल्याने यामध्ये असंख्य धार्मिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रम पार पडले.

दरम्यान, दिपोत्सव सोहळ्याला माजी आमदार सुरेश लाड, ह.भ.प.मधुकर महाराज कालेकर, ह.भ.प.हरि महाराज लाड, ह.भ.प.गोपीनाथ महाराज पाटील, ह.भ.प.दिंगबर महाराज सणस, माजी उपसभापती मनोहर थोरवे, शारदाबाई राजवाडे, शेखर पिंगळे, राजू गायकवाड, तात्या रिठे, प्रशांत खांडेकर, संतोष बैलमारे, संदीप पाटील, निवृत्ती मोरे, रमेश खांडेकर, ह.भ.प. सचिन महाराज तांडेल, प्रसाद पाटील, भिकाजी महाराज पडवल, सुरेश देशमुख, संजय देशमुख, तानाजी प्रकाश शहासणे, सोनाली खोपडे, मदन खोपडे, राजेश मोरे, चंद्रकांत पारठे, लक्ष्मण कदम, अरुण पारठे, अशोक पडवल, शिवाजी कडव, चंद्रकांत शेलार, राहूल आंबवणे, प्रकाश पारठे, हिगडे सर, पोलीस अधिकारी अभिजित वरांगळे, पोलीस संतोष भोईर, डॉ.राजेश पाटील, डॉ.नितीन पिंगळे, रवींद्र देशमुख आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने वारकरी मंडळी, खरवई ग्रामस्थ, महिला वर्ग, तरुणाई संख्येने उपस्थित होती.

Exit mobile version