हरीओमम चित्रपटातील उठ गड्या गाणे प्रदर्शित

| पाली/बेणसे । वार्ताहर ।
रायगडच्या भूमीपुत्रांचा मराठी चित्रपट विश्‍वात बोलबाला दिसून येत असून अतिशय डोंगराळ, दुर्गम भागातील उंबरठच्या सुपुत्रांनी चित्रपटाची निर्मिती करण्याचे धाडस केले आहे. जिल्ह्यातील हा पहिला व ऐतिहासिक चित्रपट असल्याने याकडे कुतूहलाने पाहिले जात आहे. रायगडचे भूमिपुत्र निर्मित हरिओम चित्रपट नरवीर तानाजी व सूर्याजी मालुसरे यांना समर्पित, हरिओम घाडगे व गौरव कदम यांनी उंबरठ येथे नुकताच ट्रेलर प्रदर्शित केला.

चित्रपटातील आणखी एक वेगळ्या धाटणीचे स्फूर्तिदायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारे गाणे प्रदर्शित झाले आहे. उठ गड्या असे या गाण्याचे बोल असून हरी आणि ओम या वीर बंधूंवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. देशप्रेमाने झपाटलेल्या या मावळ्यांची प्रेरणादायी कहाणी आणि त्यांचा खडतर प्रवास या गाण्यातून आपल्याला दिसतो. मउठ गड्याफ हे गाणे नंदेश उमप यांनी गायले असून निरंजन पेडगावकर यांनी हे गाणे शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केले आहे.

Exit mobile version