हरमनप्रीतकडे भारतीय हॉकी संघाची धुरा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय पुरुष हॉकी संघाची धुरा हरमनप्रीत सिंग याच्याकडे सोपविण्यात आली आहे. एफआयएच हॉकी प्रो लीग या स्पर्धेतील युरोपातील लढतींसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारताच्या हॉकी संघाने प्रो लीगमधील आतापर्यंत झालेल्या लढतींमध्ये दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने 8 लढतींमधून पाचमध्ये विजय मिळवला आहे. दोन लढती अनिर्णित राहिल्या आहेत. तसेच भारताला एका लढतीत पराभूत व्हावे लागले आहे. मात्र भारतीय संघ गुणतालिकेत 19 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघ युरोपचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ बेल्जियम, ग्रेटब्रिटन, नेदरलँड व अर्जेंटिना या देशांशी दोन हात करणार आहे. या महत्त्वाच्या लढतींसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय हॉकी संघ: गोलरक्षक- क्रिशन बहादूर पाठक, पी.आर.श्रीजेश. बचावफळी- हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जर्मनप्रीत सिंग, मनप्रीत सिंग, सुमीत, संजय, मनदीप मोर, गुरिंदर सिंग. मधली फळी- हार्दिक सिंग (उपकर्णधार), दिलप्रीत सिंग, मोईरंगथेम रबीचंद्र सिंग, शमशेर सिंग, आकाशदीप सिंग, विवेक सागर प्रसाद. आक्रमक फळी- अभिषेक, ललीतकुमार उपाध्याय, एस. कार्थी, गुर्जंत सिंग, सुखजीत सिंग, राजकुमार पाल, मनदीप सिंग, सिमरनजीत सिंग.

आगामी लढतींचे वेळापत्रक
26 मे – बेल्जियम. 27 मे – ग्रेटब्रिटन, 2 जून – बेल्जियम, 3 जून – ग्रेटब्रिटन, 7 जून – नेदरलँड, 8 जून – अर्जेंटिना, 10 जून – नेदरलँड, 11 जून – अर्जेंटिना.

Exit mobile version